ज्ञानदेव राजनकर
शहर प्रतिनिधी
जळगांव जामोद
बुलढाणा जिल्ह्याच्या जळगांव जामोद शहरात १४ फेब्रुवारीच्या २०२६ रात्री साडे अकराच्या दरम्यान स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती स्मारकाची एका माथेफिरु युवकाने विटंबना केल्याच्या घटनेने जळगाव जामोद शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. वाडी खुर्द परिसरात राहणाऱ्या राहुल विश्राम लांडे या चाळीस वर्षीय इसमाने महापुरुषाच्या पुतळ्यावर अंडे फेकून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक १४ फेब्रुवारी च्या रात्री घडला या घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्यास चार तासाच्या आतच पोलिस उपनिरीक्षक नागेश खाडे व सहकाऱ्यांनी घरुन अटक करून आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक १२१/२०२६,कलम २९९,१९२,१९६(१) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला,यावेळी हजारो भीम अनुयायांनी आरोपी आमच्या ताब्यात द्या अशी मागणी लावून धरली होती,सध्या जळगाव जामोद शहरात तनाव पूर्ण शांतता असून जळगाव जामोद शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती या घटनेनंतर जळगाव जामोद शहराला छावणीचे स्वरूप आले होते.उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनी सर्व नागरिकांना शांतते सोबतच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले आहे.. यावेळी भीम अनुयायी मोठ्या संख्येने जळगाव जामोद शहरात जमले होते.सामाजिक संघटनांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी जळगाव जामोद येथे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, तहसीलदार पवन पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील अंबुलकर, ठाणेदार नितीन पाटील यांचेसह सोनाळा तामगांव, नांदुरा येथील ठाणेदार शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपस्थित होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी व सम्पूर्ण तालुक्यातील भीम अनुयायी महिला व पुरुष हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
झालेली घटना ही अत्यंत दुर्देवी आहे आरोपीस आमच्या पथकाने काही तासातच अटक केली असून, आरोपीला कठोर शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही तरी सर्वांनी शांतता व सुव्यवस्था राखावी जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभवणार नाही.
डॉ.निलेश तांबे
पोलीस अधीक्षक बुलढाणा जिल्हा.







