ज्ञानदेव राजनकर जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
जळगाव जामोद : जळगाव जामोद येथे शुक्रवार, 17 जुलै रोजी सकल मातंग समाज, बुलढाणा यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांच्यामार्फत संत तुकाराम महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी समाजाच्या प्रतिनिधींनी 3 जुलै 2026 रोजी दिलेल्या निवेदनाची आठवण करून देत अनुसूचित जातींचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उपवर्गीकरण करून अ, ब, क, ड प्रवर्गानुसार आरक्षण लागू करावे, अशी प्रमुख मागणी केली. तसेच लहूजी वस्ताद साळवे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, तसेच सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर देशद्रोहासह कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. समाजाच्या वतीने राज्यभर आरक्षणाच्या समर्थनार्थ जनजागृती अभियान सुरू असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी संजय बोदडे संस्थापक अध्यक्ष, सकल मातंग समाज समन्वय व संघर्ष समिती, राजेश घोडे आझाद क्रांती सेना अध्यक्ष, कैलास खंदारे प्रदेशाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना, बबनराव बोदडे सकल मातंग समाज, जेष्ठ नेते, शांताराम तायडे, वामनराव बोरे भारतीय लहुजी सेना, वामनराव बोरसे क्रांतीगुरू लहुजी विचारमंच, वामनराव गुडेकर, विजय सानोने, कृष्णा नाटेकर, लहुजी साळवे स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष, महादेव ढगे, महेंद्र वानखडे त्यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले, संबंधित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. यावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल, एपीआय शेडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.







