नागेश निकोसे
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
ए एम सिनेमा आणि हल्दीराम आउटलेट दुकान ज्या नवीन नांदा पुनर्वसन येथे आज ४.२५ वाजता फेन्सिंग च्या मागे मोठ्याप्रमाणात प्लास्टिक आणि इतर अनावश्यक कचरा (गरबेज) साचलेला होता येथे अचानक आज दुपारी ४.२५, ला अचानक आग लागली त्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली. बाजूला ए एम सिनेमागृह, आणि नैवैदम हॉटेल देखील आहे. अचानक आग ने इतके उग्ररुप धारण केले की सर्वत्र धुव्वा पसरलेला होता. आणि आजूबाजूचे रहिवाशी देखील घाबरले. प्रत्यक्षदर्शी नी तात्काळ अग्निशमन विभाग यांना सांगितले महानिर्मिती कंपनी कोराडी, आणि महादुला नगरपंचायत ची फायर ब्रिगेड ची गाडी त्वरित घटनास्थळी पोहोचल्या त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही आणि लवकरच आगी वर नियंत्रण ठेवण्यात फायर ब्रिगेड जवानांना यश आले. या आगी मुळे काही प्रमाणात हल्दीराम आउटलेट स्टोअर चे नुकसान झाले आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.





