नागेश निकोसे
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
महादुला सेवा नंद विद्यालय च्या मैदानावर माँ जगदंबा चषक स्पर्धा सेशन ५ चे आयोजन केले होते यात रुद्रप्रतापसिह ठाकुर यांच्या राजपूत रॉयल्स संघ ने बी आर एस वॉरियर्स नामक संघ यांच्यात अतिशय अटी तटी चा फायनल झुंज झाली यातबी आर एस संघ विजयी ठरला मात्र राजपूत रॉयल्स ने कडवी झुंज दिली हे विशेष
प्रथम पुरस्कार ३१००० टीम बी आर एस ने जिंकला तर द्वितीया पुरस्कार टीम राजपूत रॉयल्स ने २१००० चे बक्षीस मिळवले टीम चे मालक सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात गरीब मुले होतकरू विद्यार्थी यांना सढळ हाताने मदत करणारे समाजसेवक रुद्रप्रतपसिंह ठाकुर आणि श्री रणजीत बेलेकर हे आहेत .जरी ते संपूर्ण स्पर्धेदरम्यान आदिनाथ युवा ब्रिगेड चे कार्यासाठी देशभरात दौऱ्यावर असतांनाही त्यांच्या टीम ला आवश्यक साधन सामुग्री पुरवीत असायचे. उद्देश केवळ एकच की ग्रामीण भागातील तरुण पिढीला स्पोर्ट्स मध्दे नेत्रदीपक यश मिळावे यातूनच पुढे भविष्यात काही चांगल्या वाटा निर्माण होतात असे त्यांनी प्रेस मीट मध्दे सांगितले त्यांच्यासोबत त्यांचे सह प्रायोजक रणजीत बेलेकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बद्दल टीमचे कॅप्टन मिथुन ठाकरे, दिनेश बिरखेडे, सागर राऊत, अशोक चतुर्वेदी, निर्वाण नवधिंगे, सुमित तलमले, रियाज अहमद, आरिफ, टिपूभाई, संकेत वर्मा, दिलीप यादव, पियूष कापसे, लक्ष्य, राहुल उमप, आणि त्यांचे कोच शेखर कान्हारकर, यांचे अभिनंदन केले आहे






