जिल्हा प्रतिनिधी नागपूर
नागेश निकोसे
नागरिकांच्या विहिरी कोरड्या पडल्या ग्रामपंचायत चे अक्षम्य दुर्लक्ष कोराडी नजीक असलेल्या घोगली ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या लेआऊट मध्दे तीव्र पाणी टंचाई भासत आहे जवळजवळ सर्वांच्या घरगुती विहिरी आटल्या आहेत.ग्रामपंचायत ला यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी सरपंच/सचिव ला रीतसर निवेदन देऊनही अद्यापही सरपंच सचिव यांनी कोणत्याही प्रकारची कृती आध्यापही केलेली नाही त्यामुळे त्यांच्याविरोधात प्रचंड रोष जनतेमध्ये दिसून येत आहे.
महानिर्मिती कंपनी कोराडी कडून भरपूर प्रमाणात टॅक्ससेशन चा निधी, सी एस आर निधी,1४,१५, वित्त आयोग निधी, मागासवर्गीय दलीत वस्ती निधी अश्या अनेकविध शासकीय योजनेतून मोठ्याप्रमाणात निधी ग्रामपंचायत मध्दे जमा असताना नागरिकांचे मत घेऊन त्यांना पिण्याच्या पाणी न देणे म्हणजे हे तर मूलभूत गरज हिसकून घेणे होय. महानुभावनगर, मंडपे लेआऊट रेहान लेआऊट केळझरकर लेआऊट ढेंगरे लेआऊट, भांगे लेआऊट या सर्व भागाचा दौरा करून जेथे शक्य असेल तेथे अतीतत्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी दक्ष पत्रकार संघ नागपूर जिला प्रमुख तथा मानवता एक सामाजिक संघटनेचे प्रमुख मिलिंद गाडेकर यांनी दूरध्वनी वरून हिंगणा वी स क्षेत्राचे आमदार समीर मेघे, जिल्हा परिषद सी इ ओ नागपूर यान्चेशी चर्चा केली असून लवकरच टँकर ची तात्पुरती व्यवस्था ग्रामपंचायत घोगली यांना करण्याच्या सूचना दिल्या आहेत नागरिकांची अतिमहत्वाच्या मूलभूत गरज म्हणजे पिण्याचे पाणी होय. हा सामान्य नागरिकांचा हक्क कुणीही हिरावू शकत नाही आपण नागरिकांच्या सदैव पाठीशी आहोत. असे या प्रसंगी कुंदा ताई राऊत माजी जिल्हापरिषदेच्या उपाध्यक्षांनी यावेळी मिलिंद गाडेकर यांना सांगितल्याचे कळते
गावातील पिण्याच्या पाण्यासाठी निवेदन अगोदरच दिले आहे तत्काळ पिण्याचे पाणी उपलब्ध करावे असे निवेदन लेआऊट मधून ग्रामपंचायत सदस्या अपर्णा मिलिंद गाडेकर, भागवत सनोडीया, सुशील तिवारी, ध्यानेश्वर हिरणखेडे, रामभाऊ पटले, रागिणी गोंडाने, मुन्नी इवनते, विशाल इवनाथे गोपाल उमाठे, पन्नालाल दमांहे, महेश शुक्ला, नामदेव राऊत, nammu शाहू, विनोद शिवणकर, राजू उदापूरे, बाळुभाऊ मडामे, आम्रपाली मडामे, माधव वानकर संजय बावनकर जगन्नाथ पोपटे, माधव वानखेडे, शरद मिरे, नरेश कुहिते, लिलाधर गौतम, पुरुषोत्तम भाऊ,, मधू दमांहे, अशोक दमांहे, शेखर आदमाने,, दिलीप वर्मा, तुरकर मधुकर आदींनी पिण्याच्या पाण्यासाठी जोरदार आवाज उठवला आहे






