नागेश निकोसे
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
राज्याचे महसूलमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे, यांच्या श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर कोराडी तर्फे आज दिव्यांग अस्थिव्यंग नागरिकांना बॅटरी वर चालणारे ट्रायसिकल वाहन वाटप करण्यात आले, यावेळी कोराडी देवीमंदिर सभागृहात मंत्रीमहोदयांचा जनतादरबारात एका बाजूला हा कार्यक्रम आयोजित केला होता
यावेळी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाचे सी इ ओ श्री.प्रविण लिखाणकर, डेप्युटी सी.इ.ओ. श्री देवेंद्र नक्षणे श्री.रवी काळे, श्री. महेश बोंडे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोज सावजी,निखिल इंगळे, महेश घुरिले, अजय सोलंकी. विजय जैन. सामाजिक कार्यकर्त्या कांचन कुथे, माजी पंचायत समिती सदस्य सविता जिचकार, मोरेश्वर बिरखेडे, अरुण सावरकर, खापा नगराध्यक्ष बोरुडे जी, सामाजिक कार्यकर्ता निशांत पाखिड्डे, सौ ट्विंकल पाखिड्डे, अमरदीप गोडबोले कल्याण अधिकारी महानिर्मिती कंपनी कोराडी, इंजी. हर्षद खंडारे, सिद्धार्थ शेंडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज पवार, संदीप घुरीले, निरंजन घुरिले, श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर दिव्यांग अस्थिव्यंग नागरिकांना आरोग्य शिबिरा अंतर्गत ट्रायसिकल वाटप करते त्यांच्यासाठी लागणारे सगळे डॉक्युमेंटेशन आणि पाठपुरावा ह्या सगळ्या बाबीची पूर्तता सामाजिक न्याय विभागाला करूनच गरीब वंचितांच्या सेवाकार्यातच खरी मानवताधर्म आपणाला दिसतो असे यावेळी मंत्रीमहोदयांनी आपले मनोगत व्यक्त केले, जनता दरबारात उपस्थितांना महालक्ष्मी जगदंबा मंदिर कडून भोजन देण्यात आले.





