रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
महागाव:
तालुक्यातील मौजा इजनी येथील अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आल्याची लेखी तक्रार इजनी येथील शिवसेना तालुका उपप्रमुख तुकाराम उमरे यांनी तहसीलमध्ये दिली आहे सविस्तर वृत असे की काही दिवसांपूर्वी इजनी येथील अंगणवाडीवर कार्यरत असलेल्या सेविकांचे निधन झाल्याने येथील रिक्त जागेवर बाल विकास प्रकल्प विभागाने कोणत्याही प्रकारची माहिती व प्रसिद्धी न करता गोपनीय पद्धतीने येथील मदतनीस यांनाच अंगणवाडी सेविका पध्दावर नियुक्त करण्यात आल्याची लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.गावातील नागरिकांना माहिती न करताच हि निवड प्रक्रिया बोगस पध्दतीने करण्यात आल्याचे आरोप दिलेल्या तक्रारीतुन करन्यात आले असून कोणत्याही प्रकारचा जाहिरनामा/जि आर. प्रसिद्धी न करताच हि निवड करन्यात आली आहे.याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनाही निवेदन सुपूर्द करण्यात आले असून शासन जि.आर.नुसार क्र.१७/०२/२३ व २०/०८/२५ नुसार अंगणवाडी सेविका पदासाठी रिक्त असलेल्या जागेची जाहिरात प्रसिद्ध करुन २ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या पात्र मदतनीस कडुन संपूर्ण कागदोपत्री प्रोसेस व अर्ज मागवुन गुणवत्तेनुसार निवड करणे बंधनकारक आहे.मात्र इजनी येथील अंगणवाडी सेविका पदासाठी हि संपूर्ण प्रक्रिया न राबविता येथील एका मदतनीस थेट अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्त करण्यात आल्याचा आरोप दिलेल्या तक्रारीतुन करन्यात आला असुन या संपूर्ण बाबींची तात्काळ चौकशी करून पात्र व योग्य असलेल्या अंगणवाडी सेविकेची निवड करण्याची मागणी इजनी येथील तुकाराम उमरे यांनी निवेदनातून केली आहे.







