नागेश निकोसे
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
मिलिंद गाडेकर अध्यक्ष तर चक्रधर राऊत उपाध्यक्ष. कोराडी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची नवयुवकांनी एकत्र येत शाखा पुनर्बांधणी जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे आणि कोराडी शाखा अध्यक्ष ताराचंद पखीडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.
बैठकीची सुरुवात संविधान प्रस्ताविकेने करण्यात आली. बैठकीमध्ये उपस्थितांना समितीचा देवाधर्माला विरोध नसून शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे असा आहे असे प्रतिपादन गौरव आळणे यांनी . केले वर्षभरातील उपक्रमांची माहिती देण्यात आली.
सखोल चर्चेअंती अध्यक्षपदी मिलंद गाडेकर उपाध्यक्ष चक्रधर राऊत कार्याध्यक्ष वंश मेश्राम प्रधान सचिव समीर चौधरी विविध उपक्रम कार्यवाह नरेश कुहिटे बुवाबाजी संघर्ष नमो साहू महिला विभाग कार्यवाह प्रतिमा ठमके युवा सहभाग कार्यवाह अंश मेश्राम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पुढील उपक्रम सर्प विज्ञान वर कार्यशाळा व वृक्षारोपण घेण्याचे नियोजन करण्यात आले.
बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांना नशाबंदी मंडळाच्यावतीने व्यसनमुक्तीचा संकल्प देण्यात आला.
बैठकीला नवीन नेवारे, नैतिक नेवारे, दिनेश कोहळे, योगेश मलीक, तन्मय मडामे, लीलाधर गौतम, रमाबाई ओगले व चंद्रकला हजारे उपस्थित होते.







