ज्ञानदेव राजनकर
शहर प्रतिनिधी जळगाव जामोद
जळगाव जामोद : तालुक्यातील खेर्डा येथे श्री संत गजानन महाराज पानपोई संस्थान येथे रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री संत गजानन महाराजांचा प्रकटदिन उत्सव आनंदात पार पडला. सदर कार्यक्रमाचा प्रारंभ हा माघ शुद्ध ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सामूहिक पारायणाने हभप प्रा.सौ.कल्पनाताई गुलाबराव इंगळे यांच्या वाणीतून झाला यानंतर झुणका भाकरीचा महाप्रसाद वितरित करून दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत श्री संत गुलाबबाबा यांच्या सानिध्यात असलेले संत शांताराम महाराज यांचा सुस्रव्य भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत श्रींचा पालखीचा भव्य रिंगण सोहळा पार पडला तर दुसऱ्या दिवशी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत पारायणा नंतर खिचडीचा महाप्रसाद वितरण झाले व त्यानंतर श्री १००८ स्वामी गोविंद चैतन्यजी महाराज छत्रपती संभाजीनगर यांचे समाज प्रबोधनपर प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला व त्यानंतर भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रुग्णांची तपासणी करून गरजू रुग्णांना औषधीचे वितरण करण्यात आले.
रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सहा वाजता श्रींचा महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर ह भ प श्री मुरलीधर लोणाग्रे महाराज यांच्या वाणीतून काल्याचे किर्तन संपन्न झाले कल्याच्या कीर्तनानंतर श्रींची महाआरती करण्यात आली महाआरती झाल्यानंतर आठ ते दहा हजार भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला महाप्रसाद वितरित सुरू असताना श्री झांबरे सर शेगाव यांचे भक्ती संगीत कार्यक्रम सुरू होता. सकाळपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ लागली होती यामध्ये जळगाव जामोद मतदारसंघाचे माजी मंत्री डॉ.संजय कुटे, सौ.अपर्णाताई कुटे ,डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर, डॉ.संदीप वाकेकर, जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील, रंगरावजी देशमुख, यांच्यासह हजारो भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले,
‘सेवा परमोधर्म’ श्रींच्या या उक्तीप्रमाणे पानपोई संस्थानचा कारभार चालत असून येथील आर्थिक व्यवहार अतिशय पारदर्शक असतो गेला १६ वर्षांपासून श्रींचा प्रगटदिन सोहळा, महाशिवरात्र,रामनवमी, ऋषिपंचमी, नवरात्र उत्सव,संत सावता महाराज पुण्यतिथी मध्ये अन्नदान केले जाते यामध्ये श्रींचे भक्तांची भक्तीची गंगा घरोघरी निरंतर वाहत रहावी हाच परमार्थिक प्रांजळ उद्देश असून श्रींचा आशीर्वाद सर्व भक्तांना लाभावा, तसेच संस्थान मध्ये श्रींचा अखंड श्रींचे नामस्मरण सुरू असून संस्थांमनध्ये श्रींनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धा जोपासले जात असून सर्व महोत्सव अध्यात्मिकपणे व्यवहारिक पारदर्शक तत्त्वावर आधारित असतो तसेच श्रींच्या चरणी श्रद्धा ठेवणाऱ्या भाविक भक्तांची लुबाडणूक होणार नाही व श्रद्धेचा बाजार होणार नाही, भक्तीचे ढोंगीपणाचे प्रदर्शन होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतल्या जाते, सदर कार्यक्रमासाठी संस्थांनचे अध्यक्ष सुधाकरराव(बाळाभाऊ) देशमुख यांच्यासह खेर्डा,निंभोरा, वडशिंगी, जामोद, चांगेफळ, अकोली, बोराळा, जळगाव, धानोरा, निवाना, रिंगणवाडी, धामणगाव, संग्रामपूर येथील सेवाधारी गावकरी व संस्थांनचे विश्वस्त यांनी अथक परिश्रम घेतले तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.







