उत्तम फड
ग्रामीण प्रतिनिधी उदगीर
उदगीर:- दिनांक 12 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार रोजी उदगीर नगपरिषद प्रागंण येथे शिवजन्मोत्सव 2026 संभाजी ब्रिगेडच्या वतीने व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला. प्रमुख शिवव्याख्यात्या, शिवमती रंजना श्रीकांत हासुरे यांचे शिवरायाची प्रेरणा ,या विषयावर व्याख्यान झाले, जयंती कोणाची होते? आजची बेरोजगारी, मुलांना कसं घडवले पाहिजे, मुलांना कोशातून बाहेर पडू द्या, शेतकरी स्वराज्याचा पाया आहे, कुठलीही अंधश्रद्धा बाळगू नका, ‘हजार खोके असण्यापेक्षा दहा डोके विचाराचे असावीत’ सर्वधर्म समभावाने वागले पाहिजे, शिक्षणाला प्राथमिकता द्या, त्याशिवाय प्रगती होणार नाही, आपल्या मुलांना मोबाईल घेऊन देण्यापेक्षा शिवरायाची प्रेरणा पुस्तक घेऊन द्या, आजच्या काळात धुर्यबंधाऱ्यावरून भांडण होत आहेत. भाऊ कसा असावा, प्रजेसाठी राजा कसा असावा, आई आणि आजी कशी असावी, आजच्या युगात शिवप्रेरनेची गरज आहे .असे सखोल व्याख्यान झाले. तर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष व पत्रकार शिवश्री उत्तम फड यांनी संभाजी ब्रिगेडचे कार्य व संघटनेची पुढील दिशा काय असणार आहे. यावर बोलताना शेतकऱ्याच्या, कामगाराच्या, दळणवळण, सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्याचे कर्तव्य, रस्ते, पाणी, लाईट, अतिक्रमणे, भ्रष्टाचार,खेडेगावातील समस्या, गोरगरीब व दिन दलितावर होणाऱ्या अत्याचारच्या प्रश्नांना वाचा फोडणे व त्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे. दवाखान्यातील सुविधाचा अभाव, शिक्षण व मतदान व प्रतिनिधी निवडताना होणारा पैशाचा बाजार यावर संभाजी ब्रिगेड यापुढे काम करणार असल्याचे सांगितले. प्रस्ताविक मराठा सेवा संघाचे प्रदीप जी ढगे सर यांनी मांडले संभाजी ब्रिगेडचे खूपच चांगले कार्य असून, जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ त्यांच्या सोबतीला आहे. महामानवाच्या व महापुरुषाच्या विचाराचे संभाजी ब्रिगेड असून ,प्रत्येक महामानवाच्या महापुरुषाच्या जयंतीला विविध कार्यक्रम घेऊन संभाजी ब्रिगेड एक पाऊल पुढे आहे खूपच छान प्रस्ताविक मांडले.
यावेळी गुणवंत विद्यार्थी अमोल रणंजीत फड एमबीबीएस, प्रणिता तुकाराम होळसंबरे भुमी उपाधिक्षक , अस्मिता राम करपा इलेक्ट्रिकेशन आयटीआय, तिरुपती बळीराम कारलेवाड केंद्रीय सीमा सुरक्षा बल, श्रद्धा राजकुमार आतनुरे तलाठी, अंजली रवी कांबळे फॅशन डिझायनर ,श्रुती पांडुरंग रावजी लॅब असिस्टंट ,अपूर्वा मुक्तन स्कॉलरशिप यांचा सत्कार उदगीर चे तहसीलदार सन्माननीय श्री राम बोरगावकर व अंजुम खादरी खादरी विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व सर्व मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष व पत्रकार शिवश्री राजकुमार माने तर प्रमुख उपस्थित कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री राम बोरगावकर, सन्माननीय अंजुम खादरी, राजकुमार आतनुरे, सतीश पाटील, अनिताताई जाधव, अनिताताई जगताप, पुष्पाताई जाधव, प्रा. वशी हाश्मी सर, प्रसाद साळुंखे, तलाठी जाधव ,संभाजी ब्रिगेड ता.अध्यक्ष राजकुमार भालेराव, जिल्हा सचिव मोहनेश्वर विश्वकर्मा,सहसचिव व्यंकट थोरे, कार्याध्यक्ष श्रीधर जाधव, बाळासाहेब चिंचोलकर,संघटक मेहबूब सय्यद,विधानसभा उपाध्यक्ष जनार्दन फड, लताबाई माने, शोभा फड, कल्पना कुमदाळे,गणपत गादगे,मुरलीधर बिरादार, सुरज माने,ज्ञानोबा माने,शंकर आतनुरे,अक्षय होळसंबरे,भानुदास फड,आनाराव फड,आनंद केंद्रें, व्यंकटी मुंडे, रामदास फड, माधव चोले,आर्जुन मुरकुटे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी जिजाऊ ब्रिगेड चे पदाधिकारी व संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.







