जलील शेख
जिल्हा प्रतिनिधी परभणी
शहरातील शब्बीर अन्सारी एज्युकेशन सोसायटी, पाथरी संचलित विविध उर्दू शाळांचे सामूहिक वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. हा कार्यक्रम शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा, जवाहर नगर येथे आयोजित करण्यात आला होता.
या स्नेहसंमेलनात सोसायटी अंतर्गत कार्यरत असलेल्या पुढील सहा शाळांचा सहभाग होता –
श्री शरदचंद्रजी उर्दू विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, एकता नगर
अब्दुल खालेख अन्सारी उर्दू हायस्कूल, एकता नगर
अब्दुल खालेख अन्सारी उर्दू प्राथमिक शाळा, एकता नगर
बीबी फातिमा उर्दू प्राथमिक शाळा, मुर्तुजा कॉलनी
अबू अय्युब अन्सारी उर्दू प्राथमिक शाळा, गुलशन नगर देवनांद्रा
शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा, जवाहर नगर मौजे बांदरवाडा
कार्यक्रमात सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. हम्द, नात, खौमी गीत, देशभक्तीपर गीत, नज्म, ‘तालीम की अहमियत’, नशामुक्ती, संविधान बचाव या सामाजिक विषयांवरील नाटिका, मुशायरा व कव्वाली यांसारख्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना शिक्षण, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख रियाज यांनी केले, तर सत्कार समारंभाचे संचालन अन्सारी जाकेर यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल हबीब अन्सारी होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष अब्दुल लतीफ अन्सारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे सचिव अब्दुल रब अन्सारी, मोहम्मद निसार अन्सारी, हातेम अन्सारी, गुलाब पठाण व जुम्मा खान यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक अब्दुल मुख्तदीर अन्सारी, मोहम्मद वसीम शेख, लईक मतीन कुरेशी, अन्सारी फरहाना मॅडम, जुनेद खान तसेच शिक्षक अब्दुल अनिख, अब्दुल जुनेद, शेख सईद व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शेवटी खैसर कुरेशी सर यांनी सर्व विद्यार्थी, प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून स्नेहसंमेलनाची सांगता केली.
या भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमामुळे पाथरी शहरातील शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध झाले असून, पालक व नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.







