भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : माहुर तालुक्यातील वाहन चालकांना रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाअंतर्गत शासकीय विश्रामगृह माहुर येथे. रस्त्यावरील सुरक्षितता व आपल्या जिवित्वाची सुरक्षीतता संदर्भात महत्वाची माहिती उपस्थित वाहन चालकांना. मोटार वाहन निरीक्षक श्री अजिंक्य गायकवाड यांनी सहज लक्षात येईल असे मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत साह्यक मोटर वाहन निरीक्षक श्री निलेश ठाकुर यांनी सुध्दा वाहन चालकांना रस्ता सुरक्षा संबंधाने सविस्तर अशे मार्गदर्शन केले. आपल्या जिवित्वाची जबाबदारी समजून हेल्मेट वापरने आवश्यक असुन ते सक्ति समजन्या एवजी आपली स्वतःची जिवनाची सुरक्षा आहे. मोटार सायकल चालवत असताना वाहतुकीची नियम काटेकोरपणे पाळावे. रस्त्यावरील सुरक्षितता इतर वाहन चालकांना सुध्दा आपल्या प्रियजनांना पण आपण जनजागृती अभियानाअंतर्गत आपल्या जिवनाची सुरक्षा महत्त्वाची बाब आहे. अशी आपण जनजागृती करावी.तसेच आपण मोटार सायकल चालवत असताना आपल्या सोबत एखाद्या इष्ट मित्र किंवा आपल्या परीवारातील किंवा आपल्या प्रिजनातील व्यक्ती बसलेली असते. पण आपण त्यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करावी. हे त्यांच्याच जिवित्वासाठी उपयुक्त आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून. सदर अपघात झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात पाठविण्याचे कर्तव्य करा. कारण आपण त्या अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात पाठवल्यास आपण केवळ त्याचेच प्राण वाचवतो असे न समजता त्यांच्या कुटुंबीयांचा आधार आपण होत आहात. कारण तो घरातील कर्ता पुरुष असु शकतो. त्यामुळे रस्त्यावर अपघात झाल्यास तात्काळ अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात पाठविण्याचे कर्तव्य पार पाडा. भरधाव वेगाने वाहन चालवु नका. धोकादायक पणे वाहन चालवु नका. वाहन चालवण्याचा परवाना नसलेल्या व्यक्तीला आपले वाहन देऊ नका. आपल्या सोबत असलेल्या पण प्रमाणाबाहेर दारू पिलेल्या व्यक्तीला वाहन चालवु देऊ नका. वाहन विमा नियमितपणे भरणे आवश्यक आहे.असे सखोल मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले आपल्या नांदेड मध्ये दरवर्षी साधारण चारशे अपघात होतात त्यात तीनशे अपघात केवळ मोटार सायकल चे असतात. त्यामुळे आपल्या रस्ता सुरक्षेची जबाबदारी समजून हेल्मेट वापरा. हे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रंशात कंकरेज यांच्या मार्गदर्शनाखाली. मोटार वाहन निरीक्षक श्री अजिंक्य गायकवाड व मोटार वाहन सह्याक निरीक्षक श्री निलेश ठाकुर यांनी माहुर येथील शासकीय विश्रामगृह येथे केले. शेवटी रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा दिली रस्ता सुरक्षा माझे ध्येय आहे. अपघात ग्रस्ताचीं मदत करणे माझे कर्तव्य आहे. रस्ता सुरक्षा प्रचार व प्रसार आणि देशबांधवाच्या सुरेक्षत माझे सौख्य सामावले आहे. अशी रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा देऊन रस्ता जनजागृती अभियानाची सांगता केली.






