अतुल चहागुणे
ग्रामीण प्रतिनिधी अडगाव बु.
तेल्हारा : तालुक्यातील महत्त्वाचे महसुल मंडळ असलेल्या अडगांव बु. येथील महसूल कार्यालय गावाबाहेर हलवण्याच्या हालचालींना वेग आला असून, प्रत्यक्ष बांधकामालाही सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, स्थानिक पुढाऱ्यांनी घेतलेल्या मौनामुळे नागरिकांनी स्वतःच याविरोधात रण फुंकले आहे. गावाच्या हृदयस्थानी असलेल्या महसूल विभागाची स्वतःची हक्काची आणि प्रशस्त जागा उपलब्ध आहे. मात्र, ही जागा अपुरी असल्याचे कारण पुढे करत महसुल प्रशासनाने गावाबाहेरील एका ‘ओपन स्पेस’ ची ग्रामपंचायत कडे मागणी करुण त्यामधे नवीन इमारतीचे बांधकाम सुध्दा सुरू केले आहे नाल्याच्या काठी कुचाड्यात ही जागा कोणाच्या फायद्यासाठी निवडली गेली, असा सवाल आता जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. कार्यालय गावाबाहेर गेल्यास ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि महिलांना नाहक पायपीट करावी लागेल. यापूर्वीच सेंट्रल बँक आणि पशुवैद्यकीय दवाखाना,पोलीस चौकी, गावाबाहेर गेल्याने मुख्य बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली आहे. आता महसूल कार्यालयही गेल्यास छोट्या व्यावसायिकांच्या रोजगारावर गदा येईल या प्रकरणी गांवकऱ्यांनी निवेदन महसुल प्रशासनासह, ग्रामपंचायत कार्यालय,खा.अनुप धोत्रे, आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे. “ओपन स्पेसची जागा शासकीय कार्यालयासाठी कशी काय हस्तांतरित झाली ?” याची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे. व गावातील च जागेवर महसुल कार्यालय बांधण्यात येवुन गांवकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे.






