राजपाल बनसोड
तालुका प्रतिनिधी दिग्रस
यंदा महाशिवरात्री आणि संत श्री सेवालाल महाराज यांची 287वी जयंती हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने भक्तीमय वातावरण झाले आहे.दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे पुरातन महादेव मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही भागवत कथेचे आयोजन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. भागवतकार ह भ प श्री प्रकाश महाराज यांच्या अमृत वाणीतूनसुरू आहे.हे सात दिवस नित्य नियमाने दोन्ही वेळेस सुरू आहे गावात भक्तीचे वातावरण आहे.त्याच प्रमाणे भारुडकार कृष्णा मेटकर महाराज यांच्या वतीने सायंकाळी भारूडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येते. त्याच प्रमाणे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण बंजारा बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन मोठ्या भक्तीभावाने बंजारा भजन, गीत, पुजाअर्चा करून साजरा करण्यात आला. त्यानंतर तेथून ग्राम पंचायत मध्ये संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सेवालाल महाराज की जय ही उद्घोषणा दिली. रोजगार सेवक रामराव मनवर यांनी आपले प्रास्ताविक मध्ये संत सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्र वर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला रायसिंग पवार, विजय पवार, सदस्य मनोज आंबेकर, प्रमोद आंबेकर, सचिन राऊत, बब्बु भाऊ,चरण पवार, सोमला राठोड, पत्रकार राजु राठोड, हरी राठोड, अनिल पवार ग्राम पंचायत चे सदस्य, कर्मचारी इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







